पाचोऱ्यात शिवसेनेतर्फे महागाई विरोधात प्रतिकात्मक अंत्ययात्रा

पाचोरा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे सर्वसामान्य जनतेचे हाल होत असून ही दरवाढ मागे घेण्यात यावी, या मागणीसाठी शिवसेना आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वात महागाई विरोधात प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी केंद्र सरकार विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आलीत.

याबाबत अधिक असे की, पेट्रोल – डिझेल, गॅस, भाजीपाला, खाद्य तेल तसेच सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे दर नियंत्रणात आणून महागाई कमी करू, रोजगार वाढवू” अशा भूलथापा मारत जनतेला “अच्छे दिन” चे स्वप्न दाखवत मोदी सरकार केंद्रात सत्तेत आले. परंतु, आज महागाई गगनाला भिडत असताना मोदी सरकार यावर एक शब्दही बोलायला तयार नाही. केंद्र सरकारने जनतेच्या विश्वासघात केला आहे. म्हणूनच जनतेचे जबाबदारी प्रतिनिधी म्हणून सामान्य जनतेचा आवाज केंद्र सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच अच्छे दिनचा जूमला देत या देशाची फसवणूक केल्याप्रकरणी केंद्र सरकारच निषेध म्हणून पाचोरा शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, शिक्षक सेना, अल्पसंख्यांक सेना व सर्व अंगीकृत संघटनांच्या वतीने महागाईची व केंद्र सरकारची प्रतीकात्मक महागाई अंत्ययात्रा आज शनिवारी २१ रोजी सकाळी १०:३० वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसिल कार्यालयापर्यंत काढण्यात आली.

याप्रसंगी आ. किशोर पाटील, उपजिल्हाप्रमुख अॅड. अभय पाटील, शहर प्रमुख किशोर बारावकर, तालुका प्रमुख शरद पाटील, जितेंद्र जैन, उद्योजक मुकुंद बिल्दीकर, जि‌. प. सदस्य पदमसिंग पाटील, उपनगराध्यक्ष शरद पाटे, नगरसेविका मालती बापु हटकर, नगरसेवक सतिष चेडे, वाल्मिक पाटील, राम केसवानी, डॉ. भरत पाटील, महेश सोमवंशी, बंडु चौधरी, आयुब बागवान, पंढरीनाथ पाटील, सुमित किशोर पाटील, जय बारावकर, जितेंद्र पेंढारकर, भरत खंडेलवाल, चंद्रकांत धनवडे, नितीन चौधरी, राहुल पाटील, गजेंद्र पाटील, सागर पाटील, विशाल राजपुत, नंदु पाटील, वैभव राजपुत, सागर पाटील, समाधान पाटील, किशोर पाटील, अनिकेत सुर्यवंशी, पंकज जाधव, महिला आघाडीच्या तालुका प्रमुख मंदाताई पाटील, उप तालुका प्रमुख सुनंदा महाजन, शहर प्रमुख उर्मिला शेळके, उप शहर प्रमुख मालती हटकर, जया पवार, रेखा राजपुत, लता वाघ, जिजाबाई निरावते, रेखा पारसीकर, बेबाताई पाटील, रत्ना पाटील, पदमाताई पाटील सह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

 

Protected Content