काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत आम्हाला देशद्रोही म्हणून हिणवले

नवी दिल्ली । काँग्रेसमधील अंतर्गत कलह अजून थांबण्यास तयार नसल्याचे दिसून येत असून वर्कींग कमिटीच्या बैठकीत आम्हाला देशद्रोही म्हणून हिणवण्यात आल्याचा गंभीर आरोप ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी केल्याने पुन्हा एकदा वादंग उठले आहे.

अलीकडेच काँग्रेस वर्कींग कमीटीच्या बैठकीच्या आधी कपिल सिब्बल यांच्यासह अन्य जेष्ठ नेत्यांनी अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे पत्र लिहून पक्षाच्या नेतृत्वाबद्दल नाराजी व्यक्त केली होती. यावरून मोठे वाद झाले होते. याच बैठकीत आपल्यासह इतर नेत्यांना हिणवण्यात आल्याचा गंभीर आरोप पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी केला आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

काँग्रेस वर्कींग कमीटीत आम्ही लिहलेल्या पत्राबाबत विचार केला जायला पाहिजे होता. या पत्रात आम्ही कोणतेही मुद्दे चुकीचे मांडले असतील तर आमची जरूर चौकशी व्हावी. परंतु, या पत्राची चर्चाच झाली नाही हे खेदजनक आहे. उलट या बैठकीदरम्यान देशद्रोही म्हणून मला हिणवण्यात आले. या बैठकीतील एकानेही याबाबत एक शब्दही काढला नाही, अशी नाराजी सिब्बल यांनी खंत व्यक्त केली.

दरम्यान आम्ही लिहलेल्या पत्रातील एकएक वाक्य पक्षाच्या हितासाठी होते. तसेच पत्रातील भाषा ही अतीशय सभ्य असल्याचे सिब्बल यांनी सांगीतले.

सिब्बल म्हणाले, माझ्यासह ज्यांनी पक्षाच्या कार्यकारणीवर प्रश्‍न उपस्थित केला त्यांचा पक्ष वाढीचाच उद्देश होता. परंतु, पक्षातील एकानेही आमच्या पत्राची दखल घेतली नाही. भाजपकडून संविधनाचे पालन होत नसल्याचे नेहमी काँग्रेस पक्षाकडून आरोप होतोय. परंतु, आमच्या पक्षाकडून ही संविधानाचे पालन झाले पाहिजे हीच आमची इच्छा असल्याचे सिब्बल यांनी व्यक्त केले.

Protected Content