दिल्लीत दोन खलिस्तान समर्थक संशयित दहशतवाद्यांना अटक

नवी दिल्ली, वृत्तसेवा । राजधानी दिल्लीत दोन संशयित खलिस्तान समर्थक दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली आहे. त्याच्यावर पंजाबच्या मोगा जिल्ह्यात खलिस्तानी ध्वज फडकावल्याचा आरोप आहे.

स्पेशल सेलचे डीसीपी संजीव कुमार यादव यांच्या पथकाने माहितीच्या आधारे इंद्रजीत सिंह आणि जसपाल सिंह नावाच्या दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. त्यांना दिल्लीतील करनाल रोडवर अटक करण्यात आली आहे. त्यांचे संबंध खालिस्तान झिंदा फोर्सशी केले जात आहेत. शीख फॉर जस्टिस या बंदी घातलेल्या संघटनेशीही त्याचा संबंध आहे.

गुप्तचर यंत्रणांनी काही दिवसांपूर्वी अलर्ट जारी करण्यात आला होता. ज्यामध्ये असे म्हटले होते की खलीस्तानवादी सक्रीय झालेले आहेत. त्यांनी १५ ऑगस्टला एखाद्या व्यक्तीने लाल किल्ल्यावर खलिस्तानी ध्वज फडकविला तर त्याला १.२२५ दशलक्ष डॉलर्स दिले जातील आणि जर सरकारी कार्यालयात ध्वज फडकविला तर त्याला अडीच हजार डॉलर्स दिले जातील अशी चिथावणीखोर माहिती प्रसारीत केली होती.

या अनुषंगाने दोन्ही संशयितांनी १५ ऑगस्ट रोजी पंजाबच्या मोगा जिल्ह्यातील उपायुक्त कार्यालयात खलिस्तानी ध्वज फडकावला. याप्रकरणी मोगा येथेही गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर हे दोघेही परदेशात पळून जाण्याच्या तयारीमध्ये होते. मात्र याआधीच, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने त्यांना करनाल रोडवर अटक केली असून या दोघांची चौकशी केली जात आहे.

Protected Content