मनवेल, शिरसाड येथे राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्ताने जंतनाशक गोळ्या वाटप

यावल, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील साकळी प्राथमिक आरोग्य केन्द्राअंतर्गत येणाऱ्या शिरसाडच्या आरोग्य उप केद्रात मनवेल व शिरसाड येथे जंतनाशक गोळ्या वाटप करण्यात आल्या

.
साकळी प्राथमिक आरोग्य केद्रातील शिरसाड उप केद्राअंतर्गत मनवेल व शिरसाड येथील अंगणवाडी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत १ ते १९ वर्षे वयोगटातील मुंलाना जंतनाशक गोळ्या वितरणाची सुरुवात शिरसाड आरोग्य उपकेद्रातील सामुदाय आरोग्य आधिकारी डॉ. आस्मा परवीन नमुउद्दीन शेख यांचाहस्ते शुभांरभ करुन गोळ्या वाटप करण्यात आल्यात. आरोग्य विभागाच्या वतीने जिल्हा परिषद व इतर सर्व शाळातील विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले. आरोग्य विभागाच्या वतीने २५ एप्रिल हा दिवस राष्ट्रीय जंतनाशक दिवस म्हणून साजरा करण्यात आला. याचे औचित्य साधून आरोग्य विभागातर्फे परिसरातील सर्व शाळा आणि अंगणवाड्या येथे जाऊन १ ते १९ वयोगटांतील सर्व मुलांना गोळ्यांचे वाटप करण्यात येत आहे. यावेळी शिरसाड उप केद्रातील सी.एच.ओ. डॉ. आस्मा परवीन नमुउद्दीन शेख, आशा स्वंयमसेविका रंजना कोळी, पुनम पाटील ,ज्योति मोरे अंगणवाडी सेविका कल्पना पाटील, उपशिक्षक सुनिल काळे, प्रविण पाटील यांची प्रामुख्याने उपस्थित होत्या.

Protected Content