यावल येथे हरितक्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती उत्साहात

यावल प्रतिनिधी । येथील तालुका कृषी विभागाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन व कृषी संजीवनी मोहीम या कार्यक्रमाचा समारोप तथा रब्बी हंगाम राजस्तरीय पिक स्पर्धा विजयते शेतकऱ्यांचा या प्रसंगी सन्मान करण्यात आला.

 यावल येथील तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने आज १ जुलै रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व . वसंतराव नाईक यांनी शेतकरी हितार्थ आपल्या सत्तेचा वापर करून कृषी क्षेत्रात दुर्मिळ व मोलाचे योगदान देणाऱ्या हरितक्रांतीचे जनक अशा महानुभव यांच्या जयंतीनिमित्ताने आयोजीत कृषी दिनाचा कार्यक्रम यावल फैजपुर मार्गावरील सेवानिवृत्त मुख्यध्यापक पी टी चोपडे सर यांच्या शेतात पार पडला . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यावल पंचायत समितीच्या सभापती सौ . पल्लवी पुरूजीत चौधरी या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणुन पंचायत समितीचे गटनेते शेखर सोपान पाटील , पंचायत समितीचे उपसभापती योगेश दिलीप भंगाळे , पाल येथील कृषी क्षेत्रातील अभ्यासक धिरज नेहते, कृषी पर्यवेक्षक एस .एच . कोल्हे, वि .के .माचले कृषी पर्यवेक्षक , बि.आर . कोळी, कृषी पर्यवेक्षक , एम .एन. बाविस्कर , कृषी सहाय्यक , आर .जी . बावस्कर , एम.एन. पाटील कृषी सहाय्यक , के .पी.बारेला, कृषी सेवक ,व्ही .डी . शिंदे , कृषी सहाय्यक या कृषी दिनाच्या कार्यक्रमाचे प्रास्तावीक पंचायत समितीचे कृषी अधिकारी डी .पी . कोते यांनी केले तर सुत्रसंचालन धिरज हिवराळे यांनी केले. 

याप्रसंगी कृषी क्षेत्रातील हरितक्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी केलेल्या अस्मणीय कार्याचा व त्यांनी घेतलेल्या ऐतिहासीक निर्णया बाबतची मार्गदर्शनपर माहीती कृषी तज्ञ धिरज नेहते , सरपंच परिषदचे जिल्हा अध्यक्ष पुरूजीत गणेश चौधरी, पंचायत समितीचे गटनेते शेखर सोपान पाटील व यावल तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव यांनी मनोगत व्यक्त केलीत तर उपस्थितांचे आभार तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव यांनी मानले. या प्रसंगी यंदा२०२० / २१ वर्षातील रब्बी हंगामातील राजस्तारिय पिक स्पर्धा तालुका पातळीवरील विजते अनिल रामचंद्र महाजन राहणार सातोद तालुका यावल या प्रगतशिल शेतकरी यांचा पंचायत समितीच्या सभापती सौ .पल्लवी पुरूजीत चौधरी यांच्या हस्ते सन्मानपत्र देवुन गौरवविण्यात आले.

Protected Content