Home आरोग्य कोरोना : जिल्ह्यात आज आढळला एक पॉझिव्हिट तर एक निगेटिव्ह रुग्ण

कोरोना : जिल्ह्यात आज आढळला एक पॉझिव्हिट तर एक निगेटिव्ह रुग्ण

0
101

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालानुसार आज दिवसभरात एक कोरोना बाधित रुग्ण आढळून आला आहे. तर एका रुग्णाने कोरोनावर मात करत सुखरुप घरी गेल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १ लाख ४२ हजार ८०७ बाधित रूग्ण आढळून आले होते. त्यापैकी १ लाख ४० हजार २२४ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर २ हजार ५७७ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या ५ ॲक्टीव्ह रूग्ण उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

 

 


Protected Content

Play sound