रासायनिक खतांच्या किंमती आटोक्यात आणा : प्रा. मुकेश येवले

यावल प्रतिनिधी । केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे खतांच्या किंमती वाढल्या असून याला आटोक्यात आणावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा. मुकेश येवले यांनी केली आहे.

प्रा. मुकेश येवले यांनी एका पत्रकाच्या माध्यमातून खताच्या किंमती कमी करण्याची मागणी केली आहे. यात म्हटले आहे की, मागील एक ते दीड वर्षापासुन देशात सर्वत्र कोरोना विषाणुसंसर्ग या मानवी जिवनास अत्यंत घातक महामारीचा वाढत्या प्रादुर्भावामुळे लावण्यात आलेली संचारबंदीमुळे आदीच आर्थीक अडचणी सापडलेल्या आहे .कोरोना बाधीतांच्या व लसीकरण संदर्भातील केन्द्राच्या अधिकार क्षेत्रात असलेल्या आरोग्य विभागाच्या गोंधळलेल्या व दिशाहिन पक्षपाती करणाऱ्या कारभारामुळे आणी इंधन व घरगुती गॅस आणी जिवनावश्क वस्तुंच्या सतत वाढत असलेल्या किमतीमुळे सर्वसामान्य नागरीका पासुन तर देशाचा अन्नदाता शेतकरी हा मोठया दुहेरी संकटात आला आहे.

देशाचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केन्द्र शासनाने रासायनिक खतांच्या वाढवलेल्या अन्यायकारक दरवाढीमुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट पसरली असुन यंदाच्या खरीप पेरणीच्या तोंडावर शेतकरी मोठया आर्थीक अडचणी आले आहे. जाणता राजा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार आणी महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री ना .दादा भुसे यांनी तात्काळ या विषयात लक्ष घालुन रासायनिक खतांच्या वाढलेल्या किमतीमुळे संकटात आलेल्या शेतकरी बांधवांनाच्या प्रश्नाकडे तात्काळ गांर्भीयांने लक्ष घालावे. व पेरणीच्या तोडांवर वाढवलेल्या रासायनिक खतांच्या प्रचंड दरवाढीस आटोक्यात आणुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा. मुकेश येवले यांनी केली आहे.

Protected Content