रोजगाराच्या नावावर आदिवासींची फसवणूक

यावल, अय्यूब पटेल | तालुक्यातील गरीब आदिवासींना ऊसतोड कामगार म्हणून रोजगार देण्याच्या नावाखाली त्यांची फसवणूक व शोषण करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून याला वेळीच आळा घालण्याची आवश्यकता अधोरेखीत झाली आहे.

याबाबत वृत्त असे की, तालुक्यातुन राज्यातील विविध विभागाकडील साखर कारख्यान्यांच्या गळीत हंगामाला सुरूवात होत आहे. या कारखान्यांवर उस वाहतुकीसाठी मोठया प्रमाणावर लागणारी मजुर हे तालुक्यातुन विविध ठिकाणाहुन मिळवण्याच्या नांवाखाली आदीवासी गोरगरिब महिला व पुरुषांची फसवणूक केली जात असल्याची धक्कादायक माहीती समोर आली असुन ,या विषयावर आदीवासी समाजसेवी संघटनांनी पुढाकार घेवुन अशा प्रकारे कारखानदारीच्या नांवावर उसतोड मजुरी देण्याच्या आमिषाखाली होणार्‍या गैरप्रकारांना वेळीच बंदी घालावी अशी मागणी होत आहे .

यावल तालुका हा आदीवासी क्षेत्र म्हणुन ओळ्खला जातो तालुक्यातील विविध गाव हे सातपुडा पर्वताच्या कुशीत तर काही गावे हे पायथ्याशी असुन यात आदीवासी बांधवांची लोकसंख्या मोठी आहे. त्यांची गरिबी आणि बेरोजगारीचा गैरफायदा घेत याच परिसरातील काही दलालांच्या माध्यमातुन मराठवाडा विभागातुन काही साखर कारखान्यांचे दलाल हे संगनमताने त्यांना आमीष दाखवितात. स्वत:चे आर्थिक हित साध्य करण्यासाठी गोरगरीब आदीवासी वाडया वस्तींवर अशा दलालांच्या मध्यस्थीने जावुन त्यांना मोलमजुरी देण्याच्या नांवावर त्यांची ट्रक व इतर वाहनाव्दारे मराठवाडा व इतर ठिकाणी सुरू होणार्‍या साखर कारखान्यांच्या ठीकाणी गुराढोरांसारखे भरून पाठवण्यात येते.

अशा प्रकारे कारखानदारीच्या गळीत हंगामाच्या नांवाखाली आदीवासी मजुरांची कुणालाही अधिकृतरित्या सुचना किंवा नोंदणी न करता मजुरी देण्याच्या नांवाखाली आदीवासी गोरगरीब लोकांची आर्थिक व मानसिक फसवणुक करण्यात येत असते. यात अनेक आदिवासी बांधवांची फसवणूक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या गंभीर विषयाकडे जागृत आदीवासी समाजसेवी संघटनांनी लक्ष देऊन हा प्रकार थांबवावा अशी मागणी आता होऊ लागली आहे.

Protected Content