लोणवाडी येथे गटारीचे पाणी रस्त्यावर ; प्रशासनाचे दुर्लक्ष

बोदवड – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । बोदवड तालुक्यातील लोणवाडी गावातील जुन्या हनुमान मंदिराजवळ गटारीचे पाणी पूर्णपणे रस्त्यावर येत असल्याने घाणीचे मोठे साम्राज्य पसरले आहे. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे पूर्णपणे डोळेझाक केली आहे.

या संदर्भात अधिक असे की, गावातील जुना हनुमान मंदिराजवळ गटाराचे पाणी पूर्णत रस्त्यावर येत आहे. पंरतु याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने पूर्णपणे डोळेझाक केली आहे. एवढेच नव्हे तर गावातील अनेक गटारी देखील तुडुंब भरल्या असून प्रशासन कोणत्या प्रकारचे लक्ष देण्यास तयार नाही. गटाराचे पाणी रस्त्यावर येण्यासारख्या गंभीर गोष्टीकडे दुर्लक्ष केले जातेय सांडपाणी थेट रस्त्यावर येत असल्यामुळे रहदारीसही मोठ्या प्रमाणात अडचण येत आहे. त्यामुळे ग्राम पंचायत प्रशासनावर नियंत्रण कोणाचे असा सवाल सर्व सामान्य जनतेकडून विचारला जात आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी ग्राम पंचायतीकडे लक्ष द्यावे, अशी मागणीही ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

 

Protected Content