बुलढाण्यात हर्षोल्लासात भरला भोंगर्‍या बाजार

बुलढाणा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आलेल्या भोंगऱ्या बाजार यंदा अतिशय हर्षोल्लासात भरविण्यात आला आहे. भोंगऱ्या बाजाराने सध्या आनंदाचे उधान आले आहे. आदिवासी ढोल व वाद्याचा आवाज घुमू लागला आहे. या भोंगऱ्या बाजारांतून पारंपारीक ठेवा असलेल्या आदिवासी संस्कृतीचे दर्शन या उत्सवातून होत असते.

आपली संस्कृती ही विविध रंगांनी नटली सजली आहे आणि त्यातच होळीचा रंग त्याला अजूनच बहार आणतो. पण यालादेखील दोन वर्षापासून कोरोनाचे ग्रहण लागले होते. परंतू, यंदा बुलढाणातील प्रसिद्ध भोंगऱ्या बाजारात आदिवासी संस्कृतीचे दर्शन पुन्हा एकदा होळीनिमित्त दिसून आले.

दोन वर्ष कुणाच्या सावता मध्ये बुलढाणा जिल्ह्यातील वरवट बकाल भोंगऱ्या बाजार भरला नाही. मात्र यावर्षी सुनगाव सोनाळा व वसाडी येथे  भोंगर्‍या बाजार भरला असून यामध्ये हजारोंची गर्दी झाली होती. या बाजारात आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडते. आदिवासी बांधवांनी होळीची वेध लागते असून हमरा भोंगऱ्या देकने आवजो रे भाया असा सूर कानी पडण्यास सुरुवात झाली आहे. सातपुड्यातील आदिवासी बांधवांच्या संस्कृतीचे जतन करणाऱ्या भोंगर्‍या बाजाराची रेलचेल होळीच्या काही दिवस आधी बाजाराला प्रारंभ होतो.

होळीचे पांग फेडण्यासाठी आदिवासी बांधव सज्ज झाले आहेत. आदिवासी हिलाल, बारेला, पावरा समाजातील होळी या सणाच्या अनन्यसाधारण महत्त्व आहे. या बाजारात घरापासून सुरुवात झाली. या बाजारात हार कंगन फुटाण्याचा प्रसाद काठी विक्रीला येते आदिवासी बांधव आपल्या पारंपारिक वेशभूषा परिधान करीत बैलगाडीने किंवा दुचाकी नाहीत तर ढोल-ताशांचा स्त्री-पुरुष तरुण-तरुणी बेधुंद नाचून आपला आनंद साजरा करतात. फुटाण्याचा प्रसाद वाटप करण्यात येतो. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या बहुतांशी आदिवासी समाजाची शेती हा व्यवसाय आहे. गरिबी जगणारा हा समाज आजही रूढी परंपरा सण उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करून आपली वेगळी संस्कृती टिकून आहे.

आदिवासी समाज बांधव वर्षभर कामानिमित्त मोलमजुरीसाठी बाहेरगावी कुठे गेला असला तरी आपल्या गावाकडे होळीनिमित्त आपल्या गावाकडे भोंगऱ्या उत्सवासाठी येतात. भोंगर्‍या बाजारात वर्षभरासाठी लागणारे वस्तू नवीन कपडे डाळ्या फुटाणे खजूर असे विविध वस्तू खरेदी करतात. तसेच आपल्या पारंपारिक वेशभूषेत बासरीच्या तालावर आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवितात. तर मग उशीर कशाचा पाहूया काही दृश्य लाईव्ह ट्रेंडस न्युज सोबत भोंगर्‍या बाजारात घेऊ या आदिवासी संस्कृतीचे दर्शन हमारो भोंगऱ्या देखणे आवजो रे भाया..

 

Protected Content