रूपाली चाकणकर यांचे कार्यालय पेटवून देण्याची धमकी

पुणे प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांचे कार्यालय पेटवून देण्याचा धमकीचा फोन आल्याने खळबळ उडाली असून या प्रकरणी एकाविरूध्द तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पुण्यातील धायरी भागात राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे जनसंपर्क कार्यालय आहे. शुक्रवारी सायंकाळी सव्वा पाच वाजता त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात एका इसमाचा फोन आला असता चाकणकर यांचे स्वीय सहाय्यक राजदीप कठाळे यांनी तो उचलला. त्यावेळी फोनवरून मी जयंत रामचंद्र पाटील बोलत असून मला रूपाली चाकणकर यांचा मोबाईल क्रमांक मागत अपशब्द वापरले. तसेच तुमचे कार्यालय पेटवून देईन अशी धमकी इसमाने फोनवरून दिली.

याबाबत चाकणकर यांचे स्वीय सहाय्यक राजदीप राजेंद्र कठाळे (वय:२५, रा. विठाई सोसायटी, धायरी) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलीस योग्य तो तपास करतील, न्यायव्यवस्थेवर आपला पूर्ण विश्‍वास असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी व्यक्त केली आहे.

Protected Content