महाविकास आघाडीला कृषी कायद्यांवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही-खा. पाटील

चाळीसगाव प्रतिनिधी । केंद्राचे कृषी कायदे हे शेतकर्‍यांच्या हिताचे असून महाविकास आघाडीला यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नसल्याचे प्रतिपादन खासदार उन्मेषदादा पाटील यांनी केले. ते भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त अंत्योदय कार्यालयात आयोजित शेतकरी संवाद कार्यक्रमात बोलत होते.

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त अंत्योदय कार्यालयात शेतकरी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रारंभ स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी खासदार उन्मेष पाटील व आमदार मंगेश चव्हाण यांनी कृषी कायद्यांबाबत माहिती दिली. खासदार उन्मेष पाटील यांनी राज्यातील महाविकास आघाडीचे नेते हे कृषी कायद्यांबाबत शेतकर्‍यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप करत टीकास्त्र सोडले.

या वेळी किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पोपट भोळे, योगाचार्य वसंतराव चंदात्रे, भाजपचे तालुकाध्यक्ष प्रा. सुनील निकम, शहराध्यक्ष घृष्णेश्‍वर पाटील, पंचायत समितीचे गटनेते संजय पाटील, के. बी. साळुंखे, गटनेते संजय पाटील, युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष कपिल पाटील, नगरसेवक चंदू तायडे, संजय घोडेस्वार, जितेंद्र वाघ, अ‍ॅड. प्रशांत पालवे, अमोल नानकर, ज्येष्ठ नागरिक आघाडीचे दिलीप गवळी, ग्राहक पंचायतीचे रमेश सोनवणे, उपाध्यक्ष भय्यासाहेब पाटील व शेतकरी उपस्थित होते. सूत्रसंचालन अमोल नानकर, प्रास्ताविक प्रा. सुनील निकम, आभार जितेंद्र वाघ यांनी मानले.

Protected Content