रविवारी युवासेनेतर्फे पारोळा येथे भव्य रक्तदान शिबीर

 

पारोळा, प्रतिनिधी ।युवासेना जनसंपर्क अभियानांतर्गत पारोळा येथे रविवार १३ डिसेंबर रोजी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे. या शिबिरात जास्तीत जास्त तरुणांनी रक्तदान करावे असे आवाहन कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा जळगाव जिल्हा बँकेचे संचालक अमोल पाटील यांनी केले आहे.

कोरोना भयावह परिस्थिती रक्ताचा तुडवडा जाणवत असुन त्याअनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रेरणेतुन युवासेनाप्रमुख तथा मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने व आमदार चिमणराव पाटील यांच्या मार्गदर्शनाने युवासेनातर्फे भव्य रक्तदान शिबीराचे पारोळा कृषि उत्पन्न बाजार समितीत आयोजन करण्यात आलेले आहे. यावेळी जो रक्तदान करतो,तोच दुसऱ्याच्या जीवनाचा दिवा लावतो त्यामुळे जास्तीत जास्त तरूणांनी या भव्य रक्तदान शिबीरात सहभाग घ्यावा असे आवाहन कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा जळगाव जिल्हा बँकेचे संचालक अमोल पाटील यांनी केले आहे.

Protected Content