जामनेरात खाद्यजत्रा महोत्सवास शहरवासीयांची मोठी गर्दी (व्हिडीओ)

जामनेर – लाइव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरांमधील मार्केट कमिटी आवारामध्ये ‘आनंद यात्री परिवारा’तर्फे ‘खाद्य, वाद्य जत्रा’ व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यात सहभागी होत विविध खाद्यपदार्थ व संगीतमय कार्यक्रमाचा आस्वाद शहरवासी घेत आहे. माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन व साधना महाजन यांनीही या हजेरी लावली.

शहरांमधील मार्केट कमिटी आवारामध्ये आनंद यात्री परिवारातर्फे दिनांक १० ते १४ तारखेदरम्यान ‘खाद्य, वाद्य जत्रा’ व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आहे. विविध खाद्यपदार्थ व संगीतमय कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन व साधना महाजन यांनीही या हजेरी लावली .

कोरोना काळात अनेक दिवसापासून सर्वजण घरामध्ये अडकून पडले होते. त्यामुळे त्यांना वेगळा कार्यक्रमाचा आनंद मिळावा या उद्देशाने त्याचबरोबर लहान-मोठे दुकानदार यांचाही धंदा मंदावला होता त्यांना वाव मिळावा या संकल्पनेतून जामनेर शहरातील आनंद यात्री परिवारातर्फे महादेवाचे जत्रा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

जामनेर येथे आयोजित या ‘खाद्य, वाद्य उत्सवा’मध्ये शंभरहून अधिक स्टॉल लावण्यात आले असून यामध्ये बचत गटांनी भाग घेतला आहे. महोत्सवामध्ये बाल कलाकारानी गीत, संगीताद्वारे आपली कला सादर केली. लहान मुलांसाठी विविध खेळणे या ठिकाणी आहे. कार्यक्रम आयोजित करण्यासाठी जामनेर आनंदयात्री परिवाराचे अध्यक्ष डॉ.अमोल शेठ, सुहास चौधरी, कडू माळी, प्रा.सुधीर साठे, डॉ.चंद्रशेखर पाटील, डॉ.पराग पाटील, डॉ.राजेश सोनवणे, अमृत चौधरी आदी. परिश्रम घेत आहे.

व्हिडीओ लिंक :
https://fb.watch/bJLWvWAsF7/

Protected Content