जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | मूळजी जेठा महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे ‘विशेष हिवाळी शिबीर’ कडगाव येथे संपन्न झाले. आपले निश्चित ध्येय साध्य करण्यासाठी अथक परिश्रम घेणे गरजेचे आहे आणि त्याची पूर्तता यासारख्या शिबीरातून होत असते. असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.सं. ना. भारंबे यांनी केले.
मू जे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी शिबीर कडगाव येथे दि २८ फेब्रुवारी ते ६ मार्च २०२२ या कालावधीत आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सं. ना.भारंबे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिबिराच्या समारोपप्रसंगी ते म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आपले व्यक्तिमत्व संस्कारशील होण्यासाठी आणि आपले निश्चित ध्येय साध्य करण्यासाठी अथक परिश्रम घेणे गरजेचे आहे आणि त्याची पूर्तता राष्ट्रीय सेवा योजना यांसारख्या शिबीरातून होत असते त्यातूनच; विद्यार्थी अधिक विकसित होत असतो”
यावेळी उत्कृष्ट संघ, उत्कृष्ट स्वयंसेवक विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना प्राचार्य व उपस्थितांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. निवडक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शिबिर आढावा रा से यो कार्यक्रम अधिकारी प्रा डी आर वसावे यांनी घेतला. याप्रसंगी जयहिंद विद्यालय कडगाव येथील उपशिक्षक चंदन कोल्हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गायत्री माळी तर आभार कैलास पावरा या विद्यार्थ्याने मानले. यावेळी महिला सहायक कार्यक्रम अधिकारी डॉ नम्रता महाजन, सहायक कार्यक्रम अधिकारी डॉ विशाल देशमुख, डॉ जयश्री भिरुड, डॉ कविता पाटील, प्रा गोपीचंद धनगर, प्रा निलेश चौधरी उपस्थित होते. शिबिर यशस्वीतेसाठी विद्यार्थी, कडगाव गावातील ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले.