यावल, लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ‘विज्ञान दिन’ नुकताच संपन्न झाला.
येथील जळगाव जिल्हा म.वि.प्र.सह.समाज संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ‘विज्ञान दिन’ प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एम.डी.खैरनार होते तर प्रमुख वक्ते म्हणुन पदार्थविज्ञान विभागाचे प्रा.डॉ.जी.भंगाळे होते. कार्यक्रमासाठी मयूर सोनवणे उपस्थित होते. विज्ञान दिनानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाच्या सुरुवातीला नोबेल पारितोषिक विजेते व भारतरत्न डॉ.सी.व्ही.रमण यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून अभिवादन करण्यात आले.
प्रा.एम.डी.खैरनार यांनी, “समस्या ही संशोधनाची जननी आहे. असे संगत डॉ.सी.व्ही.रमण यांनी केलेल्या संशोधनाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती देऊन, विद्यार्थ्यांनी जीवनात संशोधन वृत्ती जोपासली पाहिजे व जीवनात येणाऱ्या विविध समस्या सोडविल्या पाहिजेत, असे प्रतिपादन केले.
प्रा.डॉ.एच.जी.भंगाळे यांनी म्हटले की, ‘विज्ञान व तंत्रज्ञानाचा उपयोग हा नेहमी चांगल्या कार्यासाठी करावा. त्यामुळे भविष्यात सकारात्मक परिणाम आपल्याला दिसून येतात. यावेळी चारुलता पाटील व विश्वदेवी भालेराव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.एस.आर.गायकवाड यांनी केले तर आभार प्रा.डॉ.आर.डी.पवार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी युगल पाटील, अनिकेत पवार, ज्ञानेश्वर कोळी यांनी सहकार्य केले.