“आमदार चषक” खुली कबड्डी स्पर्धेत जळगाव महर्षी फाऊंडेशन संघ विजेता

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । क्रीडा क्रांती कबड्डी मंडळ आयोजित “आमदार चषक” खुल्या पुरुष गट जिल्हा कबड्डी स्पर्धेचा अंतिम सामना महर्षी वाल्मिकी संघ, जळगाव आणि महर्षी फाऊंडेशन संघ, जळगाव यांच्यात झाला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात दोन्ही संघांनी आपापल्या पराक्रमाचे प्रदर्शन करत प्रेक्षकांची मने जिंकली. निर्धारित वेळेत दोन्ही संघांचे गुण समान असल्याने महर्षी फाउंडेशन संघाने ‘सुपर-8’ मधून सामना जिंकला.

दरम्यान, महर्षी वाल्मिकी संघास द्वितीय स्थानावर तर ऑर्डन्सस फॅक्टरी वरणगाव संघास तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले.

शहरातील मानसिंगका कॉर्नर रिक्षा स्टॉपजवळ दि. २० फेब्रुवारी पासुन छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त क्रिडा क्रांती कबड्डी मंडळातर्फे “आमदार चषक – २०२२” खुली पुरुष गट जिल्हा कबड्डी असोसिएशन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विजेत्या संघास आमदार किशोर पाटील यांच्यातर्फे २१ हजार व चषक, उपविजेत्या मा. नगरसेवक भुषण वाघ यांच्यातर्फे संघास ११ हजार रुपये व चषक व तृतीय क्रमांकाच्या संघास पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस कॉन्स्टेबल राहुल बेहरे यांच्यातर्फे ७ हजार रुपये व चषक तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. भुषण मगर (पाटील) यांच्यातर्फे जाहिर करण्यात आले होते. या कबड्डी स्पर्धेत एरंडोल, पाचोरा, जळगाव, भुसावळ, ऑर्डन्सस फॅक्टरी वरणगाव येथील ११ संघांनी आपला सहभाग नोंदविला होता.

स्पर्धे दरम्यान आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत महर्षी वाल्मिकी संघ, जळगांव व महर्षी फाऊंडेशन संघ, जळगांव यांनी अंतिम सामन्या पर्यंत मजल मारली. स्पर्धेचा अंतिम सामना हा दि. २१ रोजी रात्री ८ वाजता प्रकाशझोतात खेळविला गेला. अपेक्षेप्रमाणे दोन्ही तुल्यबळ संघांनी आपल्या खेळाचे उत्तम प्रदर्शन करत उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. निर्धारित वेळेवर सामना असतांनाच दोन्ही संघांची गुण संख्या ही २३ – २३ अशी समान असल्याने पंचांच्या निर्णयानुसार “सुपर – ८” च्या माध्यमातून दोन्ही संघातील ५ – ५ खेळाडुंना राईड करण्याची संधी दिली असता यात महर्षी फाऊंडेशन संघ हा सरशी ठरला असुन या संघाने विजेते पद पटकाविले आहे. द्वितीय स्थानावर महर्षी वाल्मिकी संघ तर तृतीय क्रमांकावर ऑर्डन्सस फॅक्टरी वरणगाव संघास समाधान मानावे लागले आहे. या तीनही संघांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.

या स्पर्धेत पंच म्हणून अचुक कामगिरी करत जळगांव जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पंच प्रमुख अलेक्झांडर मनी, पंच चैतराम पवार, सुनिल राणे, नयनसागर मनी, आनंद महांगडे, अनिल कोळी, रोशन पाटील, कमलेश पाटील, सुरेश महाजन, विनय चौधरी, शकील शेख यांनी कामकाज पाहिले. स्पर्धा यशस्वीतेसाठी आयोजक वाजिद बागवान, बंटी कासार, लक्ष्मण पाटील, योगेश खैरनार, प्रशांत सोनवणे, धनराज पाटील, सचिन नरवाडे, जितेंद्र पाटील (मेजर), अमोल पाटील यांनी अथक परिश्रम घेतले.

 

Protected Content