ऑलम्पिक दिनानिमित्त शिवछत्रपती पुरस्कारार्थी खेळाडूंचा सत्कार

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात ऑलम्पिक दिवस साजरा करण्यात आला.

गुरुवार दि. २३ जून रोजी जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशन, हॉकी जळगाव व पासिंग व्हॉलीबॉल असोसिएशन व जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने २३ जून हा ऑलम्पिक दिवस म्हणून श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल जळगाव येथे साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून पोलीस उपअधीक्षक अमित कुमार मनेर, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित, डॉ अण्णासाहेब बेंडाळे महाविद्यालयाच्या क्रीडा विभाग प्रमुख डॉ. प्रो. अनिता कोल्हे, डॉजबॉल संघटनेचे राजेश जाधव व विविध क्रीडा संघटना मध्ये कार्यरत फारुक शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.

शिवछत्रपती खेळाडूंचा झाला सत्कार
ऑलम्पिक दिवसाचे महत्व पटवून देण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील शिवछत्रपती पुरस्कार खेळाडूंचा टी शर्ट देऊन सत्कार करण्यात आला. यात प्रामुख्याने शूटिंग व्हॉलीबॉलचे अशोक चौधरी ,पासिंग व्हॉलीबॉलच्या अंजली पाटील, कॅरमच्या आयशा खान व जलतरणच्या कांचन चौधरी यांचा समावेश होता.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक फारुक शेख यांनी केले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित यांनी खिलाडूवृत्तीमुळे कोणतीही गोष्ट अशक्यप्राय नाही हे उदाहरणासह स्पष्ट केले. पोलीस उपअधीक्षक अमित कुमार मनेर यांनी ते स्वतः खेळाडू असल्यामुळे त्याचा फायदा करियरवर कसा होतो व त्याचा उपयोग दैनंदिन कामगिरीवर कशाप्रकारे होत असतो हे त्यांनी आपल्या पोलीस विभागाच्या कामगिरीवरून स्पष्ट केले. खेळाडूंनी एकाग्रता, सातत्यता व चिकाटी वृत्ती ठेवावी असे आवाहन केले

सर्व सत्कारार्थीच्या वतीने उत्तर देतांना शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अशोक चौधरी यांनी खेळाडूंना सुविधा दिल्यास निश्चितच ते आपले उद्दिष्ट साध्य करू शकतात त्यासाठी संघटनांनी खेळाडूंना प्रोत्साहित करावे.

विविध क्रीडा संघटनांचे खेळाडूंचा सहभाग
हॉकी- वर्षा सोनवणे, कोमल सोनवणे, भाग्यश्री कोळी, सरला अस्वर,गायत्री अस्वर, रुपाली अस्वर, आरती ढगे, विद्या खरोटे, रोशनी राठोड, तर मुलांमध्ये शदाब ,सय्यद सत्यनारायण पवार ,चेतन कोळी, धीरज जाधव, कृष्णा राठोड, अलतमश शेख, अवेस खाटीक, फैसल खान, अब्रार सय्यद, इम्रान शेख,राहुल धुळांकर , शारिक सय्यद

व्हॉलीबॉल- धंनजय आटोळे,भावेश शिंदे,यशजंजाळे,हर्षद भोसले,अक्षय सोनार,लोकेश वळवी,विष्णु वर्मा,चित्रलेखा सोनवणे,दिशा बाविस्कर,पार्थवी विसपुते, हर्षदा पाटील.

फुटबॉल- धनंजय धनगर, पवन सपकाळे, सुरज सपके, अरपीत वानखेडे, निरज पाटील, निखिल पाटील, अमय तलेगांकर, कैशल पवार, आकाश कांबळे, संजय कासदेकर, सनी कोळी, मनीष ननावरे, दीपक ससते, नितेश पाटील यांचा समावेश होता.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!