अजित पवार त्रास द्यायचे : नाना पटोले यांचा हल्लाबोल

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसंस्था । एकीकडे शिवसेनेत उभी फूट पडली असताना आता महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमधील संघर्ष सुद्धा वाढत चालल्याचे दिसत आहे. काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार हे आमदारांना त्रास देत असल्याचा आरोप केला आहे.

 

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर थेट हल्लाबोल केला. ते म्हणाले की, अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस वगळता अन्य आमदारांना निधी वितरित करताना हात आखडता घेत असत, यामुळे अनेक आमदारांनी तक्रार केल्यावर सुद्धा याची दखल घेण्यात आली नव्हती. यामुळे आमदारांनी मधील अस्वस्थता वाढीस लागली होती तर शिवसेनेतील आमदारांचा याचमुळे स्फोट झाला असल्याचा दावा सुद्धा त्यांनी यावेळी केला. दरम्यान भारतीय जनता पक्षाने हा सर्व प्रकार केंद्रीय तपास यंत्रणांच्या बलावर करून आणल्या असल्याचा आरोप त्यांनी देखील केला.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!