संजय राऊत यांची सुनावणी पुढे ढकलली; दिली ‘ही’ तारीख !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर पुढील सुनावणी २१ ऑक्टोबर रोजी होणार आहे. मुंबईतील पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी संजय राऊत हे न्यायालयीन कोठडीत आहे. यापुर्वी देखील जामीन अर्जासाठी संजय राऊत यांनी अर्ज केला होता. त्याची सुनावणीची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. आज पुन्हा एकदा सुनावणीची तारीख २१ ऑक्टोबर रोजी दिली आहे.

मुंबई सत्र न्यायालयात अटकेत असलेले संजय राऊत यांची सुनावणी झाली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांची भेट झाली. त्यावेळी काही वेळ दोघांची चर्चाही केली. एकनाथराव खडसे यांनी राऊत यांना विचारपूस केली. “सगळं ठीक आहे. चिंता नको लवकरच बाहेर येईल” असे प्रतिक्रीया संजय राऊत यांनी खडसेंना दिली.

मुंबईतील पत्राचाळी पुनर्विकास घोटाळ्यात संजय राऊत हे मुख्य सुत्रधार आहेत. संजय राऊत यांनी त्यांचे नातेवाइका प्रवीणस राऊत यांच्या ढाल ठेवत घोटाळा केल्याचा आरोप ईडीने केला आहे. त्यामुळे राऊत यांना जामीन देवून नये अशी मागणी ईडीने केली आहे.

Protected Content