शेताच्या बांधावरून दुचाकी लांबविणारा चोरटा जेरबंद

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  जळगाव तालुक्यातील धामणगाव शिवारातील शेताच्या बांधावरून एका शेतकऱ्याची दुचाकी लांबविणाऱ्या संशयित आरोपीला खोटे नगरातून दुचाकीसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवार १८ ऑक्टोबर रोजी दुपारी अटक केली आहे. त्याच्यावर जळगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

जळगाव तालुक्यातील धामणगाव शिवारातील शेतकऱ्याची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबविली होती. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील चोरीची दुचाकी असलेल्या गुन्ह्यात संशयित आरोपी हा चोरीची दुचाकी घेऊन खोटे नगर परिसरात फिरत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. सहाय्यक पोलीस निरीक्षक  जालिंदर पळे, पोहेकॉ  जितेंद्र पाटील, अक्रम शेख, महेश महाजन, नितीन बाविस्कर, अविनाश देवरे यांनी कारवाई करत मंगळवार १८ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता संशयित आरोपी जगन्नाथ सपकाळे (वय-२९) रा. धामणगाव जि. जळगाव याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने दुचाकी चोरीची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीच्या दुचाकी हस्तगत केली आहे. पुढील कारवाईसाठी संशयित आरोपीला जळगाव तालुका पोलीस ठाण्यात देण्यात आला आहे.

 

Protected Content