चालत्या बसचे टायर निघाले; सुदैवाने अनर्थ टळला

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर ते संभाजी नगर जाणाऱ्या चालत्या बसचे टायर निघाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीत हानी झालेली नाही.

याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी २ सप्टेंबर रोजी सायंकाळी सायंकाळच्या सुमारास मुक्ताईनगर ते छत्रपती संभाजी नगर ही बस कुऱ्हा गावाजवळून रस्त्याने जात असताना अचानक एसटी बस टायरचे बेरिंग फुटल्याने चालू बसचे पुढचे चाक निघून बाहेर पडले. मात्र यावेळी बसचे चालक राजू कैलास गिरी यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ बस थांबवली व सुदैवाने कोणतेही प्रकारची मोठी घटना टळली आहे.

चालकाच्या प्रसंगावधानाने सुमारे ५० ते ६० प्रवाशांचे प्राण वाचले. अचानक घडलेल्या घटनेमुळे एस.टी. बसमधील सर्व प्रवाश्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी प्रवाशांनी एसटी बस चालक राजू कैलास गिरी यांचे आभार मानले. यावेळी जामनेरचे पत्रकार इमरान खान यांनी मदत कार्य केले. जुन्या बसमुळे ही घटना घडली असून आता तरी शासन स्तरावर तात्काळ नवीन बसेस द्यावे, अशी मागणी आता प्रवाशांनी यावेळी प्रतिक्रिया देताना केली आहे.

Protected Content