संचारबंदी : दिव्यांग बाधंवानां नगर परिषदेच्या वतीने मोफत किराणा वाटप

जामनेर, प्रतिनिधी । नगरपरिषेच्यावतीने शहरातील २८५ दिव्यांग बांधवांना अत्यावश्यक किराणा मालाची मोफत व घरपोच वाटप करण्यात आले.

कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून जरी करण्यात आलेल्या संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर जामनेर नगर परिषदेच्यावतीने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतुन दिव्यांग बांधवांना आपण मदत करत असल्याच्या भावना मुख्याधिकारी राहुल पाटील यांनी व्यक्त केल्या. शहरातील दिव्यांग बांधवांची यादी करण्यात येवून २८५ दिव्यांग बांधवांना या किराणा मालाची मोफत व घरपोच वाटप करण्यात येणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली.यावेळी नगरसेविका संध्या पाटील, नगरसेवक महेंद्र बाविस्कर,जा.ता.ए.सो.चे सचिव जितेंद्र पाटील, नगर परिषदेचे कर्मचारी दत्तु जोहरे, रमेश हिरे, संदिप काळे,आदि यावेळी उपस्थित होते.

Protected Content