वडिलांच्या मृत्यूचे राजकारण नको- पंकजा मुंडे

मुंबई प्रतिनिधी । कथित हॅकरने केलेल्या दाव्यावर मौन सोडत पंकजा मुंडे यांनी आपल्या वडिलांच्या मृत्यूचे राजकारण नको असल्याचे स्पष्टपणे मत व्यक्त केले आहे.

गोपीनाथ मुंडे यांची हत्या ईव्हीएम हॅकिंगबाबत माहिती असल्याने झाल्याचा दावा अमेरिकन हॅकर सय्यद शुजा याने केल्याने भारतीय राजकारणात खळबळ उडाली होती. या गौप्यस्फोटानंतर धनंजय मुंडे यांनी आपल्या काकांच्या मृत्यूची रॉ मार्फत करण्याची मागणी केली होती. यानंतर आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पंकजा मुंडे यांनी या दाव्यांबाबत प्रथमच मौन सोडले. त्या म्हणाल्या की, मी हॅकर नाही, गोपीनाथ मुंडेंची मुलगी आहे. मला मुंडेंच्या मृत्यूचे राजकारण करायचे नाही. गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यू झाल्यानंतर मी गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे सीबीआय चौकशीची मागणी केली होती. दरम्यान ही मागणी पूर्ण झाली आहे, तसेच त्यातून माझे समाधानही झाले आहे. आता याबाबत अधिक चौकशी करायची असेल तर देशातील मोठे नेते निर्णय घेतील.

Add Comment

Protected Content