चाळीसगाव भाजपा महिला मोर्चाच्या वतीने चक्काजाम आंदोलन

चाळीसगाव प्रतिनिधी । पूजा चव्हाण हिच्या संशयास्पद मृत्युची निष्पक्ष चौकशी व्हावी व वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनाम द्यावा, अशा मागणीसाठी भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले.

राज्यात सध्या पूजा चव्हाण यांनी आत्महत्या केली कि, तिचा घातपात करण्यात आले. याला घेऊन राजकीय वातावरण तापू लागले आहेत. पूजा चव्हाण हिच्या संशयास्पद मृत्युची निष्पक्ष चौकशी व्हावी व वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा असे विविध मागण्यासाठी चाळीसगाव भाजपा भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने आज चक्का जाम आंदोलन करण्यात आले. शहरातील छ.शिवाजी महाराज चौक येथे हा आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम,सरचिटणीस अमोल नानकर, महिला अध्यक्षा संगिताताई गवळी, नगरसेविका विजयाताई भिकन पवार, सोनालीताई विलास गुरव,वर्षाताई विवेक जोशी, तालुका चीटणीस वर्षाताई दिपकसिंग परदेशी, तालुका चीटणीस मनिषाताई शिवदास महाजन, नगरसेवक चंद्रकांतजी तायडे,नगरसेवक संजयजी घोडे, कैलासनाना पाटील, सचिन दादा महाजन, चिटणीस रणजित देशमुख, किशोरभाऊ रणधीर, सचिनभाऊ दायमा ,बबन पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

 

Protected Content