श्रीराम मंदिरासाठी आरटीजीएसने पाठविला एक कोटींचा निधी- ठाकरे

मुंबई प्रतिनिधी । अयोध्येतील नियोजीत श्रीराम मंदिरासाठी शिवसेनेने जाहीर केलेला एक कोटी रूपयांचा निधी २७ जुलै रोजी आरटीजीएसच्या माध्यमातून पाठविण्यात आल्याची माहिती आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिली आहे.

राम मंदिर निर्माण ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपालदास यांनी शिवसेनेने राम मंदिरासाठी एक कोटी दान देण्याची घोषणा केली होती. मात्र अजून यातील एक रुपयाही आला नसल्याचे विधान त्यांनी केले होते. त्यावरून उलट-सुलट चर्चा सुरू असतांनाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्वत: पत्र लिहून याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

मंदिर ट्रस्टला पाठवलेल्या पत्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राम मंदिरासाठी बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिकांचे योगदान यांनी आठवण करुन दिली. बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाहनानंतर हजारो शिवसैनिकांनी राम मंदिराच्या आंदोलनात सहभाग घेतला होता अशी आठवण करून दिली आहे. तसेच अयोध्या दौर्‍यानिमित्त राम मंदिर निर्माणासाठी १ कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. हा निधी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यावर २७ जुलै २०२० रोजी आरटीजीएसने पाठवण्यात आल्याची माहिती उद्धव ठाकरेंनी पत्रात दिली आहे.

Protected Content