ह.भ. प विजय पाटील यांच्या अभिष्ठचिंतन सोहळ्यात माजी आ. चौधरींचा सत्कार

यावल, प्रतिनिधी | तालुक्यातील किनगाव येथील ह.भ.प.विजयकुमार देवचंद पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ठचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात माजी आ. चौधरींचा सत्कार करण्यात आला.

तालुक्यातील किनगाव येथील इंग्लिश मेडीयम निवासी पब्लिक स्कुलचे चेअरमन व श्री संत तुकाराम महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था पंढरपुरचे अध्यक्ष ह.भ.प.विजयकुमार देवचंद पाटील उर्फ विजू नाना यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. दरम्यान किनगाव येथील ब-हाणपूर अंकलेश्वर महामार्गालगत असलेल्या व्यंकटेश बालाजी इंटरप्राईजेस संचलीत व्हि.मार्ट च्या प्रांगणात सुरू असलेल्या श्रीमद् भागवत महापुराण कथा वाचन सप्ताहाला माजी आमदार रमेश विठ्ठल चौधरी यांनी भेट दिली. या प्रसंगी विजयकुमार पाटील यांनी शाँल व श्रीफळ देत माजी आ.रमेश चौधरी यांचा सत्कार केला.

यावेळी व्ही.मार्टचे संचालक व इंग्लिश मेडीयम निवासी पब्लिक स्कुलचे सचिव मनिष विजयकुमार पाटील, ग्रा.प.सदस्य संजय वराडे, लिलाधर महाराज इ.उपस्थीत होते. दरम्यान ६ जानेवारी रोजी सकाळी ९:३० वाजता ह.भ.प.भाऊराव महाराज पाटील सेवानिवृत्त प्राचार्य मुक्ताईनगर यांच्या काल्याच्या किर्तनाने या सप्ताहाची सांगता होणार आहे.

 

Protected Content