‘जामनेर तालुक्यातील अवैध धंदे बंद करा’ – राष्ट्रवादीचे पोलीसांना निवेदन

जामनेर प्रतिनिधी | तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे सुरु असून यामुळे शहराची व तालुक्याची शांतता भंग होत आहे त्यामुळे तात्काळ अवैध धंदे बंद करण्यात यावे या मागणीचे निवेदन पोलीस उपनिरीक्षक अरुण राठोड यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे देण्यात आले आहे

यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते संजय गरुड पाटील, विलास राजपूत पाटील, पप्पू पाटील, उत्तमराव पाटील, राजेंद्र पाटील, राजू नाईक, प्रल्हाद बोरसे, साहिल मिस्तरी, दीपक महाराज, संतोष झालटे, डॉ.बाजीराव पाटील, मोहन चौधरी, शंकर राजपूत, अभिजीत राजपूत आदी उपस्थित होते.

निवेदनात, “जामनेर तालुक्यात जुगार, सट्टा व अवैध दारू यामुळे जनसामान्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोष निर्माण झाला आहे. या संदर्भात तक्रारी येत असून मुले व्यसनाधीनतेकडे वळत आहेत. परिणामी शहरात व तालुक्यात अशांतता पसरत असून नागरिकांना मोठा त्रास या अवैध धंदा मुळे होत असल्याचे सांगत आठवडाभरात अवैध धंदे बंद करा अन्यथा जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल” असा इशारा देण्यात आला आहे

Protected Content