यावल प्रतिनिधी । पैश्यांसाठी गहाण ठेवलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार यावल -चोपडा रोडवरील साई हॉटेल येथे २५ डिसेंबर रोजी उघडकीला आला आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, समीर जहाँगीर तडवी (वय-२९) रा. हरीओम नगर यावल ह.मु. तडवी कॉलनी रावेर जि.जळगाव हे खासगी नोकरी करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्याकडे एमएच १९ डीसी १८७५ क्रमांकाच मोपेड दुचाकी आहे. त्यांना पैश्यांची आवश्यकता असल्याने यावल-चोपडा रोडवरील साई हॉटेलचे मालक धिरज पाटील यांच्याकडून १५ हजार रूपये घेवून ९ सप्टेंबर २०२१ रोजी दुचाकी गहाण ठेवली व दुचाकी हॉटेलजवळ पार्किंगला लावली होती. दरम्यान २५ डिसेंबर २०२१ रोजी त्यांची ८० हजार रूपये किंमतीचा दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले. त्यांनी परिसरात शोधाशोध केली परंतू दुचाकी आढळून आली नाही. अखेर आठ दिवसानंतर ३ जानेवारी रोजी दुपारी यावल पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार नेताजी वंजारी करीत आहे.