सात्री येथे नदीतील रस्त्यासाठी गावकऱ्यांचा लोकसहभाग; प्रशासनाचे दुर्लक्ष

अमळनेर प्रतिनिधी । वारंवार मागणी करूनही प्रशासनाने केवळ आश्वासने दिली. मात्र आजही सात्री गावापर्यंत नदीवर पूल किंवा रस्ता नसल्याने अखेर तालुक्यातील शेतकऱ्यांचा माल विकण्यासाठी गावाने सरसावले आहे. प्रत्येक वेळी गावकऱ्यांना स्वबळावरच लढा उभारावा लागतो. आणि लोकसहभागातून व परिश्रमातून गावकरी नदीत रस्ते तयार करतात.

अमळनेर तालुक्यातील सात्री गाव एखाद्या बेटा प्रमाणे असून तालुक्यावर येण्यासाठी बोरी नदीवर पूल नसल्याने पावसाळ्यात या गावाचा संपर्क तुटतो. आरोग्य, शैक्षणिक, शेतीमाल आदी प्रकारच्या समस्या दरवर्षी उद्भवतात. यावर्षी तर पावसाळ्यात एका बलिकेला वेळेवर उपचार होऊ न शकल्याने तिचा मृत्यू झाला होता. गावकऱ्यांच्या संतप्त आंदोलनानंतर प्रशासनने रस्ता बनवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्यापही रस्ता झालेला नाही. शेतकऱ्यांनी पिकवलेली ज्वारी, मका, बाजरी, कापूस आदी माल बाजारात न्यायला रस्ताच नसल्याने शेतकऱ्यांचा माल अडकून पडला आहे.

दरम्यान, यंदा पाऊस जास्त पडल्याने काही घरे पडली. तर काही घरे गळू लागल्याने साठवलेला शेती माल खराब झाला आहे. त्यामुळे मालाची प्रतवारी खराब झाली. भाव कमी मिळणार आहे. काही शेतकऱ्यांच्या फळबाग असल्याने वेळेवर विक्री करता न आल्याने माल सडला फेकून द्यावा लागला. पाणी कमी झाल्यानन्तर देखील नदी पात्रातून ट्रॅक्टर काढण्यासाठी पुढे एक ट्रॅक्टर ओढायला आणि मागाहून जेसीबी मशीन ढकलायला लागते. ही सुद्धा खर्चिक बाब असल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे.

प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने अखेर गावकरी पुढे सरसावले आहे. आहे तो माल आहे त्या स्थितीत विकण्यासाठी नदी पात्रात रस्ता तयार करण्यासाठी लोकसहभाग आणि श्रमदान सुरू केले आहे. गाव करी ते राव काय करी या म्हणीचा प्रत्यय प्रत्यक्षात आला आहे.

 

 

Protected Content