पाच दिवस ‘या’ गोळ्या घेतल्याने बरा होणार कोरोना !

मुंबई प्रतिनिधी | कोरोनाचा प्रकोप वाढत असतांना आता याच्यासाठी किफायतशीर उपचारही उपलब्ध होत आहेत. या अनुषंगाने आजा पाच दिवसांच्या गोळ्यांनी कोरोना बरा होत असून हे औषध लवकरच बाजारपेठेत दाखल होणार आहे.

 

कोरोना उपचारात आपल्या देशातही सर्वात स्वस्त मोल्नुपिरावीर ही अँटीव्हायरल गोळी उपलब्ध झाली आहे. या गोळ्यांचा पाच दिवसांचा कोर्स असून याची किंमत १ हजार ३९९ रुपये इतकी आहे. कोरोनावरील ही आतापर्यंतची सर्वात स्वस्त अँटीव्हायरल गोळी ठरणार आहे. या मुळे  कोविड संसर्गाची सौम्य लक्षणे असणार्‍या रूग्णांवर परिणामकारक उपचार होणार आहेत.

 

कालच या औषधीला मान्यता मिळाली असून ती लवकरच बाजारपेठेत दाखल होणार आहे. मोल्नुपिरावीर (८०० एमजी) ही अँटीव्हायरल गोळी आहे. १८ वर्षांवरील रुग्णांना कोरोनाची सौम्य संसर्ग असेल तरी ही गोळी दिवसातून दोन वेळा घ्यावी लागेल. या अँटीव्हायरल गोळ्यांचा पाच दिवसांचा कोर्स आहे. या गोळ्यांची किंमत ही सर्वसामान्यांच्या आवाक्यातील आहे. विशेष म्हणजे मोल्नुपिरावीर  या अँटिव्हायरल गोळीला ब्रिटनच्या औषध नियंत्रण नियामक मंडळाने मंजूरी दिली आहे.

 

भारतीय औषध नियामक मंडळानेही मोल्नुपिरावीर  या अँटिव्हायरल गोळीच्या उत्पादन आणि पुरवठासाठी सन फार्मा, सिप्ला, टोरेंट, इमक्युअर आणि डॉ. रेड्डी या कंपन्यांना परवानगी दिली होती.

Protected Content