रमजान महिन्यात लोकसभा निवडणुका नको : मुस्लिम धर्मगुरु

election commission2

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी जाहीर केल्या आहेत. परंतु 6 मे पासून अल्पसंख्याक समुदायाचा रमजानचा महिना सुरु होणार आहे. मुस्लिम समाजासाठी असणाऱ्या पवित्र रमजान महिन्यात निवडणुका घेऊ नये, रमजाननंतर निवडणुका घेण्यात याव्यात, अशी मागणी देवबंदी उलेमा या मुस्लिम संघटनेने केली आहे. दरम्यान, मदरसा जामिया शैखुल हिंदचे आलीम मुफ्ती असद कसमी यांनी देखील लोकसभा निवडणुकींच्या तारखांवर आक्षेप घेतला आहे.

 

रमजानसारख्या पवित्र महिन्याची मुस्लिम समाज वर्षभर आतुरतेने वाट पाहतो. मुस्लिम समाजासाठी हा महिना पवित्र मानला जातो. यावेळी मुस्लिम रमजानचा रोजा ठेवतो, नमाज पठण करतो या काळात निवडणुकीत मतदान करणे शक्य होणार नाही, असे मत मुफ्ती असद कसमी यांनी व्यक्त केले आहे. मुस्लिम धर्मगुरु खालिद रशीद फरंगी यांनीही लोकसभा निवडणुकीच्या तारखांवर आक्षेत घेतला आहे. खालिद रशीद फरंगी यांनी लोकसभा निवडणुकीचे मतदान रमजाननंतर घेण्यात यावे अशी मागणीही केली आहे. तृणमूल काँग्रेसचे नेते फिरहाद हकीम यांनीही लोकसभा निवडणुकीच्या तारखांबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने पुर्नविचार करावा अशी मागणी केली. लोकसभा निवडणुकीच्या तारखांवर मुस्लिम समाजाकडून आक्षेप घेतल्याने केंद्रीय निवडणूक आयोग काय भूमिका घेते,याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Add Comment

Protected Content