राज ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्षरोपण

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त झाडे लावा झाडे जगवा या सामाजिक व विधायक उपक्रमाच्या अंतर्गत वृक्षरोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांच्या ५५ व्या वाढदिवसा निमित्ताने फैजपुर मार्गावरील यावल कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या जवळ असलेल्या साईनगर या ठिकाणी असलेल्या खुल्या भुखंडावर विविध प्रकारचे वृक्षारोपण करण्यात आले. या वृक्षांच्या संपूर्ण संगोपन करण्याची जबाबदारी महाराष्ट्र नवनिर्माणसेनेच्या सर्व पदाधिकार्‍यांनी स्विकारली आहे.

या कार्यक्रमाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनहित विभागाचे जिल्हाध्यक्ष चेतन अढळकर, मनसेचे यावल तालुकाध्यक्ष किशोर नन्नवरे, शहराध्यक्ष गौरव कोळी, जिल्हा उपाध्यक्ष अजय तायडे ,श्याम पवार, कुणाल बारी, शुभम बोरसे, सामाजीक कार्यकर्त नितीन सोनार, बांधकाम अभियंता अनिल पाटील यांच्यासह आदी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहुन वृक्ष लावली. तर, कार्यक्रमास उपस्थितांचे आभार मनसेचे यावल तालुका अध्यक्ष किशोर नन्नवरे यांनी मानले.

Protected Content