गरुडविद्यालयामध्ये सोशल डिस्टंसिंग पाळुन शालेय पोषण आहाराचे वाटप

शेंदुर्णी, प्रतिनिधी । येथिल गरूड प्राथमिक विद्यामंदीर आणि विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारातील तांदुळ आणि डाळींचे वाटप करण्यात आले.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपुर्ण देश लॉक डाऊन असल्याने शासनाने शालेय पोषण आहारअंतर्गत विद्यार्थ्यांना शाळेतून मिळत असलेल्या आहाराचे उर्वरीत तांदुळ आणि डाळीचे वाटप करण्याचे आदेश जारी केले असल्याने धान्याचे वाटप करण्यात आले. संस्थेचे चेअरमन संजय गरूड यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील सर्व शिक्षकांनी लहान गटासाठी २ किलो आणि मोठ्या गटासाठी ५ किलो तांदुळाचे पॅकेट तयार करण्यासाठी मेहनत घेतली. विद्यार्थ्यांच्या पालकांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून बोलविण्यात आले होते. त्यानुसार विद्यार्थी अथवा पालक यांना सोशिअल डिस्टंसींग पाळून वाटप करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे चेअरमन संजय गरूड, माध्यमिकचे मुख्याध्यापक संजय उदार, प्राथमिकचे बी. टी. माळी, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक सर्व उपस्थीत होते.

Protected Content