Home Cities जळगाव अयोध्यानगरात आयुष्यमान भारत योजनेच्या लाभार्थ्यांची नोंदणी (व्हिडीओ)

अयोध्यानगरात आयुष्यमान भारत योजनेच्या लाभार्थ्यांची नोंदणी (व्हिडीओ)

0
54

जळगाव प्रतिनिधी । राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अभिषेक पाटील फाऊंडेशन यांच्यावतीने आयुष्यमान भारत योजनेच्या लाभार्थ्यांची नोंदणी करुन कार्ड वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम आज गुरूवारी २२ जुलै रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आला.

राष्ट्रवादीचे सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष जितेंद्र चांगरे यांनी पद्मावती मंगल कार्यालय आणि राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस सरचिटणीस पंकज बोरोले यांनी अयोध्या नगर असे दोन ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आला.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, जितेंद्र चांगरे, उत्तर महाराष्ट्र विभागीय प्रमुख कल्पना पाटील, युवक अध्यक्ष स्वप्निल नेमोडे, सरचिटणीस पंकज बोरोले, विनोद पाटील, तुषार पाटील, कौसर काकर, ममता तडवी, मगर, कमल पाटील, अर्चना कदम, शकुंतला धर्माधिकारी, शंभू रोकडे , पवन माळी, चिंतामणी सोनवणे यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते. या उपक्रमाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला.

https://www.facebook.com/508992935887325/videos/1015729272513244


Protected Content

Play sound