राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त उद्या चाळीसगावात कार्यक्रम

जळगाव प्रतिनिधी । चाळीसगाव येथील तहसील कार्यालयात शुक्रवार 24 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 10 वाजता राष्ट्रीय ग्राहक दिनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

उपविभागीय अधिकारी लक्ष्मीकांत साताळकर हे अध्यक्षस्थानी असतील.  खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती राहील. राष्ट्रीय ग्राहक दिन 2021 या दिनानिमित्त केंद्र सरकारने Consumer –Know Your Rights ही संकल्पना निश्चित केलेली आहे. या निमित्ताने  ग्राहकांचे प्रबोधन व्हावे, या दृष्टिकोनातून ग्राहक संरक्षण कायदा 1986 यावर प्रबोधनपर कार्यक्रम व ग्राहक जागृती विषयक प्रदर्शन या कार्यक्रमाचे आयोजन तहसील कार्यालय, चाळीसगाव येथे करण्यात येणार आहे.

चाळीसगाव तालुक्यातील नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. विशेषत: ग्राहकांना तक्रार करावयाची असल्यास त्यांनी ई- फायलिंग तंत्राचा अवलंब करावा, यासाठी सीएससी केंद्रानी ग्राहकांना साहाय्य करावे, असे तहसीलदार अमोल मोरे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.

 

Protected Content