मेहरूण परीसरात घरफोडी; सोन्या दागिन्यांसह रोकड लंपास

crime 4 3

जळगाव प्रतिनिधी । मेहरूण येथील साईबाबा मंदिराजवळ 7 जून रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह 68 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची प्रकार 5 मे रोजी सकाळी उघडकीस आला. याबाबत अज्ञात चोरट्यांनी विरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मीना संजय पाटील वय 40 रा. प्लॉट नंबर, 10 गट नंबर, साईबाबा मंदिर, मेहरूण तलाव हे आपल्या पती व दोन मुलांसह राहतात. 4 जून रोजी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास सर्वजण जेवण आटोपून घराच्या वरच्या मजल्यावरील गच्चीवर झोपण्यासाठी गेले. झोपण्या अगोदर त्यांनी घराच्या मागच्या दरवाजा आतून बंद केला होता. अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री 5 जून पहाटे पाच वाजेच्या पूर्वी प्रवेश दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत घरातील कपाटात ठेवलेले 40 हजार रुपये किमतीचे 20 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, 12 हजार रुपये किमतीचे 8 ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातले डूल, 5 हजार रुपये किंमतीची 2 ग्रॅम चिप, 3 हजार रुपये किमतीच्या 4 भार वजनाचे चांदीच्या तोरड्या आणि 8 हजार रुपये रोख रक्कम असे एकूण 68 हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचे उघडकीस आले. याबाबत मीना पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Add Comment

Protected Content