मुक्ताईनगर प्रतिनिधी | मुक्ताईनगर तालुक्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी देशी-विदेशी दारू किरकोळ अथवा होलसेल भावात विक्री होत आहे. कुठलाही परवाना नसताना ही दारू कशी विकली जाते ? हा विक्रीचा नेमका कुठला प्रकार आहे? याकडे प्रशासनाचे लक्ष नाही की कानाडोळा केला जात आहे? असे प्रश्न नागरिकांना पडत आहेत
मुक्ताईनगर शहरांमध्ये बऱ्याचशा ठिकाणी हॉटेलचे नाव करून दारू विक्री केली जाते. हा प्रकार पोलीस प्रशासनाच्या लक्षात का येत नाही ? हा प्रकार त्यांना दिसत नसावा का ? की या सर्व प्रकाराकडे जाणून बुजून डोळेझाक केली जात आहे ? असे प्रश्न नागरिकांना पडत असून या प्रकारावर स्थानिक पोलिसांकडून कुठलीही कारवाई होत असल्यामुळे नागरिक प्रश्न उपस्थित करत आहे. शहरामध्ये बऱ्याच काही ठिकाणी हात गाड्यांमध्ये दारूचा मोठा व्यवसाय होत असून भर चौकामध्येही दारू मोठ्या प्रमाणात विकली जात असल्याचे चित्र नजरेस पडत आहे.
मुक्ताई मंदिराजवळील मुक्ताई चौक, बोदवड रोड, मुंबई नागपूर हायवे लागून छोट्या टपरीतसुद्धा दारू विक्री केली जाते. काही लायन्सन असलेल्या दुकानांमध्ये मुद्दे मालाचा स्टॉकपेक्षा जास्त माल उपलब्ध असतो. त्या ठिकाणीसुद्धा कारवाई होत नाही. मुक्ताईनगर शहरामध्ये अथवा तालुक्यामध्ये जळगाव येथील एल सी बी रेड बहुतांशवेळा पडलेली आहे. मात्र स्थानिक पोलिसांकडून या प्रकाराकडे दुर्लक्ष का केलं जातं ? ही बाब गुलदस्त्यातंच असल्याची चर्चा नागरिक करत आहे.
मागील मुक्ताईनगर मध्ये प्रभारी पी आय रामकृष्ण पवार असताना मुक्ताईनगरमध्ये स्थानिक ठिकाणी बहुतांश वेळा हातभट्टीचे अथवा देशी दारूचे मोठे जाळे त्यांनी पकडले होते. व वरील अवैध कामास आळा बसावा यासाठी त्यांनी जोरात कारवाई सुरू केली होती त्याचाच परिणाम म्हणून त्यावेळेस अवैध धंदे बंद झाले होते. त्यामुळे त्यांची तात्काळ बदली केली गेली असावी ! अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरु आहे.