Home धर्म-समाज आज पाचोरा महाराष्ट्र वाणी युवा मंचतर्फे विद्यार्थ्यांचा गुणगौरव

आज पाचोरा महाराष्ट्र वाणी युवा मंचतर्फे विद्यार्थ्यांचा गुणगौरव

0
83


पाचोरा, प्रतिनिधी | महाराष्ट्र वाणी युवा मंच शाखा पाचोरातर्फे गुणवंत, ज्ञानवंत व भाग्यवंत अशा विद्यार्थ्यांचा गुणगौरव ९ वा व १० वा समारंभ एकत्रितपणे भडगाव रोडवरील महालपुरे मंगलकार्यालयात आयोजित करण्यात आला आहे.

 

गुणवंत, ज्ञानवंत व भाग्यवंत अशा  द्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभाचे उद्घाटन महाराष्ट्र वाणी युवा मंचचे प्रदेश अध्यक्ष राजेंद्र पाचपुते (धुळे) यांचे हस्ते करण्यात येणार आहे. अध्यक्षस्थानी लोहटार येथील सुंदरबाई सिताराम मालपुरे माध्यमिक विद्यालयाचे चेअरमन विजय रामकृष्ण मालपुरे हे उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून पाचोरा येथील संस्कार वाणी संस्थापक अध्यक्ष योगेश येवले, माजी उपनगराध्यक्ष शरद पाटे, भा.ज.पा. शहराध्यक्ष रमेश मुरलीधर वाणी यांची उपस्थिती राहणार आहे. हा गुणगौरव सोहळा आज रविवार दि. ५ डिसेंबर रोजी दुपारी २:३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांना राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक तथा महाराष्ट्र पें. अ. पुणे कोषाध्यक्ष यादवराव सिनकर यांचे हस्ते बक्षिस वितरण करण्यात येणार आहे. तसेच परिसरातील प्रथम कन्यारत्न प्राप्त दाम्पत्यांचा सत्कार भाजपा शहराध्यक्ष रमेश मुरलीधर वाणी यांचे हस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन कार्याध्यक्ष विशाल ब्राम्हणकर, उपाध्यक्ष अशोक बागड, शाखाध्यक्ष लक्ष्मण सिनकर, खजिनदार विवेक ब्राह्मणकर, तालुका अध्यक्ष किरण अमृतकर, ज्येष्ठ संघटक प्रविण शेंडे, ज्येष्ठ सल्लागार राजेंद्र चिंचोले, संस्थापक शाखाध्यक्ष डी. आर. कोतकर, कार्यकारिणी सदस्य योगेश शेंडे, रमेश महालपुरे, हर्षल माकडे, महेंद्र महालपुरे, संदिप महालपुरे, विजय सोनजे, प्रकाश येवले, सुनिल कोतकर, गणेश सिनकर, संजय शेंडे यांनी केले आहे.


Protected Content

Play sound