यावल पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण

यावल -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील चुंचाळे येथील गावातील जुनी शौचालय पाडून त्या ठिकाणी महिला व पुरुषांसाठी नवीन शौचालयाची बांधकाम करणे यासह गावातील सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता करण्यासह अन्य नागरीहिताच्या मागण्यासाठी चुंचाळे येथील ग्रामस्थ मुबारक नवाब तडवी यांनी येथील यावल पंचायत समितीच्या कार्यालयासमोर आपल्या बेमुदत उपोषणास प्रारंभ केला आहे.

तालुक्यातील चुंचाळे ग्रामपंचायत अंतर्गत येथे महिलांसाठी असलेले शौचालयाच्या सभोवताल अस्वच्छता राहत असल्याने दुर्गंधी सुटत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ती शौचालय पाडून त्या ठिकाणी नवीन शौचालयाचे बांधकाम करावे यासह गावातील सार्वजनिक ठिकाणी ग्रामपंचायत कडून स्वच्छता केली जात नसल्याने गावात सर्वत्र अस्वच्छतेचे साम्राज्य आहे तसेच ग्रामपंचायतच्या विहिरीवरून गावात होत असलेल्या पाणी पुरवठ्याची पाईपलाईन अनेक ठिकाणी फुटलेली असल्याने नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होत असल्याने ती तात्काळ दुरुस्त करावी यासह ग्रामपंचायतीत ग्रामसेवक हे नियमित येत नसल्याने, नागरिकांची कामे होत नसल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

याबाबत ची चौकशी करून ग्रामसेवकांवर तात्काळ कार्यवाही करावी अशा विविध मागण्यांचे निवेदन येथील यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना दिले असुन यावरील मागण्यासंदर्भात मुबारक तडवी यांनी १५ ऑगस्ट २०२२ रोजी चुंचाळे गावात ग्रामपंचायती समोर आमरण उपोषण केले होते त्या वेळेस सहाय्यक गटविकास अधिकारी किशोर सपकाळे यांच्या लिखित आश्वासनाने व ग्रामसेवक प्रियंका बाविस्कर आणि सरपंच पाटील याच्या मध्यस्थी तडवी यांनी आपले उपोषण सोडले होते. मात्र तिन महीने संपल्यावर आले तरी चुंचाळे गावात कोणत्याच समस्याचे निराकरण न झाल्याने अखेर मुबारक तडवी यांनी पंचायत समिती समोर आपले आमरण उपोषण सुरू केले आहे. मुबारक तडवी यांच्या उपोषणाला अनेकांनी आपला पाठिंबा दर्शविला आहे.

 

Protected Content