यावल प्रतिनिधी | तालुक्यातील मारूळ गावास तहसीलदार महेश पवार यांनी भेट दिली असता त्यांच्या उपस्थितीत गावात विविध प्रशासकीय उपक्रम राबविण्यात आलीत.
मारूळ ता.यावल येथील आयडियल हायस्कूल येथे आयोजीत करण्यात आलेल्या कार्यक्रमात गावाचे प्रथम नागरीक सरपंच असद सैय्यद यांनी तहसीलदार महेश पवार यांचे स्वागत केले. मतदार नोंदणी अभियानांतर्गत १८ वर्षांवरील युवकांना आपले नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट करणे, नांवात चुकीचे नाव दुरूस्ती करणे, नवीन विवाहितांनी नाव नोंदणी करणे ही मोहीम उस्फूर्तपणे व शिस्तबद्ध पध्दतीने कशी राबविली या विषयी मार्गदर्शनपर माहिती उपस्थित ग्रामस्थांना दिली. कोवीड १९ प्रतिबंधात्मक लसीकरण याबाबत नागरिकांनी चांगला प्रतिसाद देत कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घेतले.
मुस्लिम समाज्याच्या कब्रस्थानच्या ज्वलंत प्रश्नावर चर्चा करून नवीन कब्रस्थानचा प्रश्न लवकर मार्गी लावण्यासाठीची मागणी केली. यावेळी म.प.सह.सोसायटीचे चेअरमन जिया-उल्-हक सैय्यद, आयडियल हायस्कूलचे प्राचार्य शेख अशपाक, व्हाईस चेअरमन मसरुर अली सैय्यद, ग्राम पंचायत सदस्य मतिउर रहेमान पिरजादे, कबीर मेंबर, साहेब अली सैय्यद, पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते