‘त्या’ पीकविमा प्रकरणांच्या चौकशीस प्रारंभ

जळगाव,प्रतिनिधी ।  मुक्ताईनगरमध्ये नुकतेच पीक विमा सर्वेक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांकडून लाच घेण्याची घटना उघडकीस आली होती. त्यासंदर्भात बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स कंपनीकडून पत्रक काढून कंपनी शेतकऱ्याकडून किंवा पॉलिसीधारकाकडून कोणतेही पैसे घेत नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. 

 

बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स कंपनी कोणत्याही भागात विमा दावे निकाली काढण्यासाठी किंवा दाव्यांचे सर्वेक्षण करण्यसाठी शेतकऱ्यांकडून किंवा पॉलिसीधारकाकडून कोणत्याही प्रकारे पैसे घेत नाही, तसेच सेवा पुरवठादाराकडून असे पैसे घेण्याचे सहन करत नाही, असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.  मुक्ताईनगर येथे पिक विमा सर्वेक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांकडून लाच घेण्यात आल्याने या घटनेची अंतर्गत तपासणी सुरू करण्यात आली असून संबंधित तपास यंत्रणांना कंपनी संपूर्ण सहकार्य करत आहे, असे पत्रकात म्हंटले आहे. लाच घेणाऱ्या व्यक्ती बजाज अलियान्झ कंपनीचे प्रतिनिधी नाहीत पण कंपनीतर्फे काही सेवा पुरवण्याची कामे करणाऱ्या एका एजन्सीची ती माणसे असावीत असे सकृत दर्शनी वाटते.  दोषीं विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे आणि त्या प्रकरणाचा पुढे तपास करण्यात येत आहे, असे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

 

Protected Content