पहूर येथे तब्बल २१ वर्षांनी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन उत्साहात

पहूर ता. जामनेर, प्रतिनिधी | तालुक्यातील पहूर येथील आर .टी .लेले हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन तब्बल २१ वर्षानंतर आयोजित करण्यात आले. यावेळी विविध ठिकाणचे विद्यार्थी एका छताखाली आले.

तालुक्यातील पहूर येथील आर. टी .लेले हायस्कूलच्या माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी एकत्रित येऊन तब्बल २१ वर्षांनंतर स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले. गुरुजनांचा ऋण व्यक्त करण्यासाठी आर. टी. लेले हायस्कूल येथे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. आजच्या धकाधकीच्या जीवनातही मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद अशा अनेक शहरांमध्ये नोकरीनिमित्त बाहेर गावी गेलेले. सर्व मित्र-मैत्रिणींनी यासाठी वेळात वेळ काढून आवर्जून हजेरी लावली. हे पाहून शाळेतील विद्यार्थ्यांना अतिशय आनंद झाला. तसेच माजी शिक्षकांनाही गहिवरुन आले. दरम्यान कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती मातेचे पूजन करण्यात आले. शाळेचे माजी पर्यवेक्षिका सुहासिनी जोशी , वसंत जोशी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या स्नेह संमेलनाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक आर. बी. पाटील हे होते. तर सदर कार्यक्रमास माजी मुख्याध्यापक अशोक खांजोडकर, भालेराव ,गिरीश भामरे , मालकर , किशोर पाटील, विज्ञान शिक्षक ए. पी. पाटील ,माजी लिपिक भामरे ,सोनवणे इत्यादी शिक्षकवृंद या मेळाव्यास उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनीही आपले मनोगत व्यक्त करून शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला .तसेच माजी विद्यार्थिनी वंदना मुंजाळ हिने आपल्या मनोगतातून आम्हाला दरवर्षी माहेर हवे असे बोलून हा कार्यक्रम प्रत्येक वर्षी असावा अशा भावना व्यक्त केल्या.
यावेळी अशोक खांजोडकर , भालेराव , ए. पी. पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणातून आर .बी .पाटील आपल्या माजी विद्यार्थ्यांना संबोधित करताना आपल्या मुलांना शाळेतील गमती जमती सांगून त्यांना मोकळे खेळू द्या मोबाईलचा अतिरेक टाळा. असे आवाहन केले.

यावेळी मनीषा बारी, अर्चना बेलपत्रे, शोभा सावळे ,पो पा शारदा देशमुख ,सीमा पाटील ,नीलिमा नागपुरे रेखा पवार ,प्रमोद आस्कर, निळकंठ बेलपत्रे ,ईश्वर बारी, ज्ञानदेव करवंदे ,विनोद बारी, योगेश घोलप, उज्वला बारी, गीता पांढरे, यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण भडांगे यांनी तर आभार सोमनाथ भावसार यांनी मानले. स्नेह मेळावा यशस्वी होण्यासाठी जयंत जोशी, रमण क्षीरसागर ,किशोर वानखेडे, जगदीश पांडव, संजय काळे, आदींनी परिश्रम घेतले.

Protected Content