पाचोरा, प्रतिनिधी | जागतिक संघटना आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनच्या वतीने योगा निसर्गोपचार तज्ञ डॉ.नितीन जमदाडे यांना खान्देश गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनच्या वतीने हाॅटेल सिल्वर पँलेस जळगाव येथे घेण्यात आलेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, खासदार उन्मेश पाटील, महापौर जयश्री महाजन, यांच्या हस्ते खान्देशातील चिकित्सकांच्या योगदानाची दखल घेत इंटरनँशनल मेडीकल असोसिएशन आँफ इंडियाने खान्देश गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. या पुरस्कार वितरण समारोहात पाचोरा तालुक्यातील वाणेगाव येथील योगा निसर्गोपचार तज्ञ डॉ.नितीन जमदाडे यांना देखील सन्मानित करण्यात आले. त्यांच्या कोरोना काळातील कार्याची दखल घेत हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी संघटनेचे व्हाईस चेअरमन डॉ. नितीनराजे पाटील, संघटनेचे अध्यक्ष डॉ. सतीश कराळे, सुवर्ण पुनर्वसु आयुर्वेदचे संचालक डॉ. राकेश झोपे, आयुर्वेद तज्ञ डॉ. कृष्णमुरारी शर्मा, डॉ. हर्षल बोरोले, युनानी अध्यक्ष डॉ. मोहम्मद बेग, होमिओपॅथी उपाध्यक्ष डॉ. राजेंद्र पडोळ, होमिओपॅथी महिला अध्यक्ष डॉ. आशा भोसले, एक्युपंक्चर उपाध्यक्ष डॉ. लिना बोरोले, नेचरोपेथी अध्यक्ष डॉ. केदार कुलकर्णी, तुषार वाघूळदे, विरेंद्र गिरासे व राज्यातील अनेक पदाधिकारी या सोहळाला उपस्थित होते. डॉ. नितीन जमदाडे यांना हा पुरस्कार मिळाल्या बद्दल सर्व मित्रपरिवार कडून शुभेच्छांची वर्षाव आणि कौतुक होत आहे.