Home राजकीय नोटबंदी बद्दल केंद्राने देशाची माफी मागावी : राऊत

नोटबंदी बद्दल केंद्राने देशाची माफी मागावी : राऊत

0
47

नवी दिल्ली वृत्तसंस्था | आज नोटबंदीला पाच वर्षे पूर्ण होत असतांना नोटबंदी बद्दल केंद्र सरकारनं संपूर्ण देशाची माफी मागायला हवी, अशी मागणी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

पंतप्रधान मोदी यांनी नोटबंदीचा निर्णय जाहीर केल्यास आज पाच वर्षे होत आहेत. यानिमित्त खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. यावर बोलताना, केंद्र सरकारने नोटबंदी बद्दल देशाची माफी मागायला हवी अशी टीका केली आहे.

याप्रसंगी राऊत यांनी भाजपच्या केंदीय अध्यक्षांवरही जोरदार हल्लाबोल केला. जे. पी. नड्डा यांनी त्यांच्या नेत्यांना सांगितलंय महाविकास आघाडी सरकार उखडून फेका. जे. पी. नड्डांनी अगोदर कश्मीरमधील दहशतवादी उखडून फेकल पाहिजेत. आणि मग महाविकास आघाडी सरकारचं पाहाव, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.


Protected Content

Play sound