एसटी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपला मनसेचा पाठींबा

यावल प्रतिनिधी । राज्य परिवहन मंडळाच्या एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या बेमुदत संपाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठिंबा दर्शविला आहे. सोमवारी ८ नोव्हेंबर रोजी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी एसटी कर्मचाऱ्यांची भेट घेवून पाठिंबा दिल्याचे पत्र दिले आहे.

दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, राज्य परिवहन मंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण झाले पाहिजे. एस.टी.ची करार पध्दत रद्द करावी, शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कार्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू करावे यासह विविध मागण्यांसाठी राज्यातील सर्व एस.टी. कर्मचाऱ्यांनी रविवारी ७ नोव्हेंबर रोजी दुपारपासून अचानक बेमुदत कामबंद केले आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशान्वये यावल आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपला पाठिंबा दिला आहे. शासनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करावे अशी देखील मागणी केली आहे.

या निवेदनावर मनसेचे जनहित जिल्हाध्यक्ष चेतन अढळकर, तालुका उपसंघटक विकास पाथरे, शहराध्यक्ष किशोन नन्नवरे, विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष गौरव कोळी, विद्यार्थी सेनेचे विपूल येवले, शहर उपाध्यक्ष आबिद कच्छी यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Protected Content