भाजपा आयटी सेलच्या यावल तालुकाध्यक्षपदी स्नेहल फेगडे

यावल प्रतिनिधी । भाजपा आयटी सेलच्या यावल तालुकाध्यक्षपदी स्नेहल फेगडे यांची निवड करण्यात आली.

 

भाजपाची महत्त्वपूर्ण बैठकीत सामाजीक कार्यकर्ते स्नेहल संजय फिरके यांची ही निवड करण्यात आली. सदरची नियुक्ती ही भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष उमेश रेवा फेगडे यांनी केली. याप्रसंगी ओबीसी सेलचे जळगाव जिल्हा उपाध्यक्ष हेमराज फेगडे, भाजपा तालुका सरचिटणीस विलास चौधरी, शहराध्यक्ष निलेश गडे, यावल नगर परिषदचे तत्कालीन नगरसेवक डॉ.कुंदन फेगडे, यावल शहर उपाध्यक्ष योगेश चौधरी, शहरउपाध्यक्ष राहुल बारी, शहर सरचिटणीस परिष नाईक,युवा मोर्चा शहराध्यक्ष रितेश बारी ,पशाचे जेष्ठ कार्यकर्ते वसंत बापू भोसले, भुषण फेगडे यांची उपस्थिती होती. यावेळी स्नेहल फेगडे यांच्या निवडीचे पक्षाच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे .

Protected Content