चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या सततधार पाऊसामुळे साथीच्या आजाराने डोकेवर काढले आहे. हे आटोक्यात आणण्यासाठी मोरसिंग राठोड यांनी धूर फवारणीची मोहीम हाती घेतली असून त्याची सुरवात तालुक्यातील सांगवी येथून करण्यात आली आहे.
चाळीसगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या पाऊसामुळे डेंगू, मलेरिया व इतर आजाराच्या साथीने थैमान घातले आहे. या साथीच्या अजारला कंटाळून सर्व सामान्य जनतेचे हाल झाले आहे. अगोदरच अतिवृष्टीनी हातातोंडाशी आलेला घास हिरवल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यात या आजाराने घरात शिरकाव केल्यामुळे अनेक कर्जबाजारी होऊन त्यांचे जगणे असाह्य झाले आहे. मात्र हि गंभीर स्वरुपाची बाब भारतीय बंजारा क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष मोरसिंगभाई राठोड यांच्या लक्षात येताच त्यांनी स्वखर्चाने तालुक्यात धूर फवारणीला सुरुवात केली आहे. याची सुरुवात तालुक्यातील सांगवी येथील डॉ. आंबेडकर चौकातून बुधवार, १३ आक्टोंबर रोजीपासून केली आहे. यामुळे डास व मच्छरांपासून प्रसारित होणारी रोगराही बऱ्यापैकी आटोक्यात येणार असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. मोरसिंगभाई राठोड व मोरसिंगभाई राठोड मित्र मंडळ यांच्या विशेस सहकार्यातून हि मोहीम हाती घेण्यात आली आहे.
यावेळी भारतीय बंजारा क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष मोरसिंगभाई राठोड, ग्रामीण पोलीस स्थानकाचे सपोनि रमेश चव्हाण, माजी सरपंच रोहिदास राठोड, माजी उपसरपंच उत्तम चव्हाण, वकील भरतकुमार राठोड, सामाजिक कार्यकर्ता मुकुंद भगवान चव्हाण, ग्राम रोजगार सेवक दादाभाऊ जाधव व ग्रामस्थांच्या उपस्थीतीत ह्या मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. तत्पूर्वी या अभियानाला माजी सरपंच तथा विद्यमान उपसरपंच गोरख राठोड(शिंदी ), उपसरपंच राविभाऊ मोरे (पिंपरखेड) व इतर कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले आहे. मोहिमेदरम्यान मोरसिंगभाई राठोड यांनी आपल्या मनोगतात दहा झाडांच्या संरक्षणासाठी कवच देण्याचे जाहीर केले. यामोहीमेमुळे मोरसिंगभाई राठोड यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.