आर्म्स अॅक्ट उल्लंघन प्रकरणी राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल

ठाणे , लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – गुढीपाडव्यानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यात मंगळवार १२ रोजी रात्री सभा घेतली होती, या सभेनंतर राज ठाकरे यांच्या विरोधात नौपाडा ठाणे पोलीस ठाण्यात आर्म्स अॅक्ट उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

मंगळवारी ठाण्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरें यांनी गुढीपाडव्यानंतर उत्तर सभा घेतली. या सभेनंतर झालेल्या टीकांसह उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठीच हि सभा घेतली असल्याचे राज ठाकरेंनी म्हटले होते. यासभेस येण्यापूर्वी राज ठाकरे मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास केकी मूस रोडवरील सभेच्या ठिकाणी पोहोचले. यावेळी राज ठाकरे यांचा तेथे भगवी शाल, तलवार देऊन स्वागत करण्यात आल्यानंतर राज ठाकरे यांनी म्यानातून तलवार बाहेर काढत उंचावून दाखवली. या प्रकरणी आर्म्स अॅक्ट उल्लंघन केले म्हणूत नौपाडा पोलीस स्थानक, ता. जि. ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाण्यामधील सभेमध्ये राज यांनी स्टेजवरुन तलवार म्यानातून काढून दाखवत आर्म्स अॅक्टचं उल्लंघन केले यावरून राज ठाकरे यांच्यासह सुमारे १० जणांच्या विरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांच्यासह ७ ते ८ जणांविरुध्द भा.द.वि. कायदा कलम ३४, भारतीय हत्यार कायदा १९५९, कलम ४ व २५ नुसार नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content