मंगळग्रह मंदिर येथे तीन दिवसीय शतचंडी महायज्ञ

अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । येथील श्री मंगळदेव ग्रह मंदिरात जगातील एकमेव भूमीमातेची मूर्ती नुकतीच उभारण्यात आली आहे. या चैत्र नवरात्रीनिमित्त आज मंदिरात तीन दिवसीय शतचंडी महायज्ञ पार पडला.

संतश्री प्रसाद महाराज यांच्या हस्ते ११ एप्रिल रोजी पूर्णाहुती झाली. यावेळी आमदार अनिल पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले तीन दिवसीय महायज्ञाचे मुख्य यजमान होते. या महायज्ञासाठी रोज ११ भाविक सपत्नीक पूजेचे मानकरी होते.

दिननिहाय मानकऱ्यांची नावे अशी :- 

९ एप्रिल २०२२ रोजी प्रथम दिनी जगदीश गुरव, प्रकाश वाघ व योगेश देशमुख (जळगाव), धनराज चौधरी, दत्तात्रय कोळपकर, प्रवीण देशमुख, सीए आकाश वर्मा, प्रा. सुरेश पाटील, रोहित सोनार, दिनेश नाईक (सर्व रा. अमळनेर), १० एप्रिल रोजी प्राचार्य विजय बहिरम, पंकज मराठे व प्रसाद भंडारी (अमळनेर), अविनाश पाटील, ओंकार उदावंत, सौरभ धूत (नाशिक), किरण पाटील व मधुकर सावंत (जळगाव), श्रीकांत कदम (यवतमाळ), जगदीश नरवाडे (माहूर), तर ११ एप्रिल रोजी निवृत्त पोलिस उपअधीक्षक श्यामकांत सोमवंशी (जळगाव), राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, अतुल निकुंभ, संजय अग्रवाल, आयडीबीआय बँकेचे व्यवस्थापक प्रेमसिंग सोळंके (अमळनेर), सतीश अग्रवाल व राजेश वाणी (धुळे), शरद सोनवणे व राजेंद्र सोनवणे (पारोळा), चोपडा येथील काँग्रेसचे शहराध्यक्ष संजीव बाविस्कर, आनंद महाले (मुंबई), या महायज्ञाचे आचार्य केशव पुराणिक मुख्य पुरोहित होते.

अन्य पुरोहितांची नावे अशी :-

सारंग पाठक, सुनील मांडे, तुषार दीक्षित, प्रसाद भंडारी, जयेंद्र वैद्य, गणेश जोशी, मिलिंद उपासनी, हेमंत गोसावी, विनोद जोशी, भय्या उपासनी, व्यंकटेश कळवे, सौरभ वैष्णव, दिव्येश जोशी, मयूर राव, यतीन जोशी, मेहूल कुलकर्णी, अथर्व कुलकर्णी, कार्यक्रम यशस्वितेसाठी मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव एस. बी. बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजीनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल, अहिरराव, जयश्री साबे, सेवेकरी विनोद कदम, खिलू ढाके, रवींद्र बोरसे, विनोद अग्रवाल, ग्रीनरी कन्सल्टंट सुबोध पाटील आदींनी सहकार्य केले.

दरम्यान, पूर्णाहुतीप्रसंगी ज्येष्ठ नेते अनिल शिसोदे, प्रा. अशोक पवार, प्रा. रंजना देशमुख, प्रा. प्रवीण देशमुख, अप्पर पोलिस उपअधीक्षक रमेश चोपडे, पोलिस उपअधीक्षक राकेश जाधव, तहसीलदार मिलिंद वाघ, पोलिस निरीक्षक जयपाल हिरे आदींसह अनेक मान्यवरांची तथा भाविकांची मोठी उपस्थिती होती.

 

Protected Content